पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

श्री संभूआप्पाची आरती

जयदेव जयदेव श्रीसंभूनाथा l महत् पुरुषा तू कृपावंता l

इरुबाई साधी अर्धांगी कांता l ओवाळीतो आरती नमवूनि माथा ll धृ ll

तुझ्या दृष्टांताचा महिमा पाहून l भक्तगण येती धाव घेऊन l

यथा शक्ति भावे गलफ् वाहून l उरुसात फिरती फकीर होऊन ll १ll

निश्चयाने कोणी नवस करितो l कोणी हृदया माझी हेतू धरितो l

कृपा दृष्टी तुझी सदभक्ता l मन कामना होई पूर्ण ती ll २ ll

नसता पुत्र नवसा देतोसी बाळ l अनाथाचा सदा करी सांभाळा l

सरंक्षणी गुप्त फिरतो त्रिकाळ l न कळे तुझाबा हा दैवी खेळ ll ३ ll

कलयुगी एक श्री संभू देव l भक्त जन शोधी चरणाचा ठाव l

संकटी रक्षाया घेई हा धाव अवतारी संभूआप्पा श्रीसांब देव ll ४ ll

कार्तिक पौर्णिमा सुवर्ण दिन l उगवता होते मन प्रसन्न ll

अगणित नैवेद्य चढे तोरण l मठा मधे झढे नगारा जाण ll ५ ll

मुक्ती स्थान नाम प्राप्त उरुणास l आशास्थान हेचि भाविक भक्तास ll

ठेवा संभू आप्पा वरदहस्तास l आरती गुंफितो विभूते दास ll ६ ll


                                           - शाहीर विशारद बापुसो विभुते


श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.