पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

पार्श्वभूमी

     सांगली जिल्ह्यातील,वाळवे तालुक्यात प्रगतीपथावर असणारे एक निम शहरी गांव म्हणजे ‘उरूण-इस्लामपूर”.ऐतिहासिक वारसा असणारे,सुमारे ७५ हजार लोकसंख्येचे हे इस्लामपूर, ‘क्रांतीकारकांचे’ गांव म्हणूनही स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुप्रसिद्ध आहे..

      इस्लामपूरला वैभशाली अशी ऐतिहासिक परंपरा आहे तत्कालीन सातारा जिल्ह्याच्या उरूण-इस्लामपूर गांवी मुस्लीम लोकांची संख्या लक्षणीय होती.गांवाच्या चारही बाजूस असणारे पीर याची साक्ष देतात.गावचे मुळचे नांव ईश्वरपूर कारण इथे मंदिराची संख्या भरपूर.तसेच उरुण येथे हिंदूची संख्याही अधिक.उरूण आणि इस्लामपूरच्या मधोमध उरणाई देवीचे मंदीर होते.पूर्वी ही दोन्ही स्वतंत्र गावे होती परंतु कालांतराने उरुण-इस्लामपूर सीमा रेषाच पुसल्या गेल्या अन् उरुण-इस्लामपूर ‘एकच’ झाले. खऱ्या अर्थाने हिंदु-मुस्लीम ऐक्य झाले.गांवचे हे नावं ‘सार्थक’ करणारे हिंदु व मुस्लिम धर्मीयांची अपार श्रध्दा असणारे इथले पवित्र स्थान म्हणजे अर्थातच ‘श्री संभूआप्पा-बुवाफन मठ”.

      सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ, की ज्या काळात अस्पृश्यता बोकाळलेली होती, हिंदु-मुस्लीमांमध्ये व्देषाची बीजे पेरली जात होती,हिंदु-मुस्लिमांमध्ये गांवोगावी वाद भडकले जावून त्यांचा भांडणात तिसऱ्याच व्यक्ती स्वत:चा स्वlर्ध साधत होत्या. अशा काळात उरुणात वास्तव्यास असलेल्या श्री संभूआप्पानी त्यांच्याही अगोदर साडेतीनशे वर्षे होऊन गेलेल्या श्री बुवाफन यांना गुरु मानले.तसे पाहिले तर श्री संभूआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील,तर श्री बुवाफन हे मुस्लीम.खरें तर संत महात्म्यांना जात-धर्म नसतो.विशाल अवकाशातून भ्रमण करीत साऱ्या जातीभेदंlच्या श्रृंखला तोडून सारं विश्व एकाच मानवता धर्माच्या छताखाली आलेलं ते पहात असतात. किंबहुना हेच स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो.

भक्तजनहो.......

      श्री संभूआप्पा-बुवाफन म्हणजे पुराणकाळातील कबीर-–कमाल या गुरु-शिष्य जोडीचा पुनरावतार !

      बुवा म्हणजे साधू व फन म्हणजे फकीर ! संत महंतांना जाती –धर्म नसतो.नव्हे नव्हे कुणीही जाती-भेदाच्या अवजड बेड्यांत अडकून राहू नये याचसाठी त्यांचा अवतार असतो व मानवता धर्माची स्थापना करणे हेच त्यांचे अवतार कार्य असते.

     श्री संभुआप्पांनीही कबीराप्रमाणेच साऱ्या जातीधर्माचे धागे एकत्र गुंफून मानवतेचं अखंड वस्त्र विणलं. ते आपल्या हाती कफनीच्या रुपात सोपवून आपलं अवतार कार्य संपवलं,जिवंत समाधी घेतली.

       आजही जाती भेदांच्या पलीकडे जावून मानवता धर्माची उभारणी करणं. त्याचाच प्रचार आणि प्रसार करणं हेच आपलं इतिकर्तव्य ठरावं !!

         “ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन l

          श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ll”


श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.